१ मे. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. १९६० च्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य जन्मास आले. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या दिवशी द्वैभाषिक सौराष्ट्राला विभागून महाराष्ट्र(मराठी) व गुजरात(गुजराती) ही राज्ये बनवली गेली. त्यानंतर राजा बढे यांनी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या ओळी रचल्या. एकभाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी प्राण गमावले.
किल्ले रायगड मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख धरून आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून १७व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवण्याचे निश्चित केले आणि राज्याभिषेक करवून घेतले.
किल्ले रायगड मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख धरून आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून १७व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवण्याचे निश्चित केले आणि राज्याभिषेक करवून घेतले.
महाराष्ट्र दिनाचे अवचीत्त साधून रायगडला भेट देणे ही एक पुण्याची गोष्ट आहे.
दिनांक १ मे २०१०, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी (५० वर्षे पूर्ण) औचित्य साधून शिवनिष्ठ प्रतिष्ठान, सायन, दोन दिवसांची एक भव्य रैली आयोजित केली होती. बरेच शिव प्रेमी तरुण सहभागी झाले होते..
दिनांक १ मे २०१०, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी (५० वर्षे पूर्ण) औचित्य साधून शिवनिष्ठ प्रतिष्ठान, सायन, दोन दिवसांची एक भव्य रैली आयोजित केली होती. बरेच शिव प्रेमी तरुण सहभागी झाले होते..
रैली चा कार्यक्रम असा होता:-
१) १ मे सकाळी ६.३० वाजता :- प्रतीक्षा नगर, सायन ते हुतात्मा चौक रैली
२) हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली
३) ७.३० वाजता : - हुतात्मा चौक ते पनवेल
४) ८.३० वाजता :- पनवेल ते रायगड
ठरल्या प्रमाणे सकाळी ६.30 वाजता सर्व सह्याद्री संघ / शिवनिष्ठ प्रतिष्ठान , प्रतीक्षा नगर मधून बाईक वरून निघाले, सफेद सदरा, भगवे फेटे , भगवे झेंडे, सर्व वातावरण - प्रतीक्षा नगर जणू भगवे झाले होते.. जय भवानी - जय शिवाजी चा नाद करत, आमची निघालो ते थेट ७.०० वाजता हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलो, शिवनिष्ठ प्रतिष्ठान चे तिथे आगमन होताच सर्वांचे लक्ष आमच्या कडे गेले, तेथे आम्ही सर्वांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली, काही मिडिया वाले आमची मूलाखात घ्याला तयार होते, वेळात वेळ काढून आम्ही त्यांना थोडा वेळ दिला.. व पुढील कार्यक्रमाला रवाना झालो... फोर्ट, मेट्रो तोकीज,पायधुनी, गिरगाव, भाईकला, दादर, सायन, चेंबूर, वाशी, पनवेल, पेन, वडखळ नका, माणगाव, महाड अश्या रोड ने आम्ही महाड ला सुखरूप पोहोचलो....
पायथ्याला पोचताच पावसाचा फवारा सुरु झाला.. त्याला दाद न देता, सर्व सह्याद्री संघ / शिवनिष्ठ प्रतिष्ठान गडावर मार्गस्त झालो.. पुन्हा एकदा जय शिवाजी जय भवानी चे नाद संपूर्ण रायगडात घुमू लागले... शब्द कमी पडतील त्या वेळेचा आंनद वक्त करायला. गडावर पोहोचताच महाराजाना पुष्पहार घालण्यात आला.
*** सह्याद्री संघ ***
This all 1st May Mahatrashtra Day special event has been successfully completed by with the help of these all Members.
Sahaydri Sangh : Sachin Chavan, Bhushan Indulkar, Vishal Mhaske, Umesh Mane
Shivnishtha Pratishthan : Ganesh Sark, Darshan Panchal, Bhushan Shirke, Mangesh Keny, Nandu Sarak, Kalpesh Mali and othersss...
Shivnishtha Pratishthan / Sahaydri Sangh