March 15, 2012

Sahaydi Sangh Trek to Dhaak Bahiri ......thrill


ढाक बहिरीच्या नावानं....चांग भल 

एका साहशी ट्रेकची अनुभुती आणि प्रचंड निसर्गातल्या एका रौद्र देवतेचे दर्शन घेऊन "सुखरुप" परतल्याचे समाधान !
oo कपाळात येणे म्हणजे काय ? हे अनुभवायचं असेल तर एकदा तरी ढाक बहिरीला जाऊन याच !

ढाक म्हणजे महराष्ट्रातील ट्रेकर्सची पंढरी... ढाकला आपण गेला नसाल तर आपण अजून नवखे/बच्चे आहात अश्या अर्थानी लोक बघतात... ! ढाकचा ट्रेक म्हणजे महाराष्ट्रातील काही अवघड किल्ल्यांपैकी एक. कर्जत पासून पूर्वेकडे २० kms अंतरावर सांडशी गावात जावे.. कर्जत पासून गावापर्यंत गाडी मार्ग जातो. सांडशी गावातून एका दिवसात ढाकचा किल्ला व ढाक बहिरीची (भैरी/ढाकच्या भैरवाची) गुहा बघुन परत येता येते... गावातून पायवाट धरून समोर दिसणाऱ्या सुळक्याकडे चालत रहाव...जरास पुढे जाऊन पायवाट दिसेनाशी होते...व घनदाट जंगल असल्यामुळे फसव्या वाटा दिसतील...वर जाताना लेणी समोरच्या दिशेला दिसत राहिली पाहिजे...पुढे जाऊन जंगल संपते आणि समोर उभा राहतो प्रचंड मोठा काळा कातळ..तो वर चढून गेल्यावर उजव्या बाजूस कलाक्राय सुळका दिसतो... कळकराय सुळका अंगावर पडेल असे वाटते व डावीकडे दगडाच्या छातीमध्ये ढाकची जगप्रसिद्ध गुहा दिसते. गुहेत चढुन जायला थोडेसे सोप्या श्रेणीचे (पुस्तकातील सोपी. आपल्यासरख्या माणसांना तेही भितीदायक वाटते :) ) प्रस्तरारोहण करावे लागते. शेवटचे दहा फुट चढताना मात्र नक्की काळजी घेणे आवश्यक आहे.

ढाकच्या गुहेत गेलो की लक्षात येते की वर दोन गुहा आहेत. प्रथम गुहेत बहिरी देवाचा म्हणजेच भैरोबा/भैरवाचा रंग फासलेली दगद दिसतो. याच गुहेमध्ये दोन पाण्याची डटाकी आहेत. यातील पाणी पिण्यासाठी वापरता येते पण हल्ली फारच खराब झाले आहे. याच पाण्यात काही मोठी काही छोटी भांडी बुडवलेली आहेत. ही भांडी खालच्या गावातील लोक जत्रेच्या वेळेला वापरतात. आपणही भांडी वापरुन परत धुवोन ठेवली तर चालते. दुसरी गुहा ही बळीचे प्राणी पक्षी मारायला वापरतात असे वाटते. कारण दुसर्‍या गुहेत जी पाण्याची कुंडं आहेत ती पाण्याऐवजी प्राण्या-पक्ष्यांच्या केसा पिसांनी भरलेली दिसतात. येथे वासही फार घाण येतो. हे असे नेहमी असते क ते माहित नाही पण आम्ही गेलो तेव्हा तरी असे दिसले.

ढाकच्या गुहेतुन उतरायला तिन मार्ग आहेत, एक म्हणजे आलो तसे परत जाणे. दुसरे म्हणजे दोर बांधुन १००-१२० फुट रॅपलींग करुन उतरणे अथवा तिसरे म्हणजे थेट उडी मारणे :)

ढाकला जेव्हा केव्हा जाल तेव्हा काही खबरदारी घ्यायला विसरु नका.
१. येथील गुहांमध्ये चप्पल बुट चालत नाहीत.
२. ढाकच्या बहिरीच्या गुहेत स्त्रियांना परवानगी नाही.
वरील दोन्ही गोष्टी गावातले बरेच लोक असतील तेव्हाच पाळायच्या. शक्यतो अश्या ठिकाणी गावकर्‍यांच्या भावना दुखावुन चालत नाही.
३. प्रथमोपचार पेटी बाळगा.
ढाक बहिरीच्या नावानं....चांग भल ! असा आवाज द्यायला विसरू नका !




Dhak Bahiri Cave

Trek Start point
Sachin chavan

Dhak Bahiri Devi
myself Bhushan Indulkar
view from base
Fort Rajmachi view from dhaak

Sahaydri Sangh

No comments: