January 6, 2009

छत्रपती शिवाजीराजे



छत्रपती शिवाजीराजे


मराठी साम्राज्याचे संस्थापक आणिएक आदर्श शासनकर्ता म्हणूनओळखले जाणारे छत्रपतीशिवाजीराजे भोसलेएकसर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणूनमहाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिलेजातात. शत्रूविरुद्धलढ्याकरतामहाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधेअनुकूल असलेली गनिमी काव्याचीपद्धत वापरून त्यांनीतत्कालीनविजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणिबलाढ्य मुघल साम्राज्यशाहीह्यांच्याशी लढादिला, आणि मराठीसाम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणिमुघलसाम्राज्य बलाढ्य असलीतरीमहाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्तस्थानिक सरदारांवर आणिकिल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवरअन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणिउत्तम शासनाचे एक उदाहरणभावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

ई.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), राजगड, आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.


आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी ई.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला ज्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धेआयुष्य युद्धे करण्यात गेले .

लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, राजकारभाराचे दादोजी कोंडदेवांकडून तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते. समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.

सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" म्हणतात. पुण्याखाली १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.:--- पवन मावळ,आंदर मावळ, कानद मावळ , गुंजण मावळ, पौड मावळ ,मुठाखोरे ,रोहिड खोरे ,हिरडस मावळ

शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी :- तानाजी मालुसरे , बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी प्रभू देशपांडे ,नेताजी पालकर हंबीरराव मोहिते आणि मुरारबाजी.
शिवाजी महाराजांचे सरसेनापती :- नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहीते







हे हिंदू नृसिंहा, प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

============================================================

प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया


============================================================


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा


===========================================================


जै जयंती, जै आदीशक्ति, जै काली कपर्दिनी |
जै मधु कैटभ छलनी, देवी जै महीषा विप्रदिनी |
इन्द्र जीमी जंभपर, वाढव सुअंभ पर,
रावण सदम्भ पर, रघुकुल राज है |
पौन बारीबाह पर, संतु रतीनाह पर,
ज्यो सहसत्रबाह पर, राम द्वीजराज है |
दावा दृमदंड पर, चीता मृगझुंड पर,
भूषण बितुंड पर, जैसे मृगराज है |
तेज तम अंस पर, कान्हा जीमी कंस पर,
त्यों मलेच्छ वंश पर, शेर शिवराज है | सर्जा शिवराज है


=========================================================



========================================================

=========================================









No comments: