January 28, 2009

किल्ले "जंजीरा"












किल्ले "जंजीरा"

Murud - Janjira

Murud is 167 km away from Mumbai, on the Konkan Coast. One can either travel by road, via Panvel and Alibaug or take a ferry from Gateway to Mandwa, near Alibaug and travel about 50 kms by road.

Sahaydri Sangh planned for 1 1/2 days. Day 1 was for exploring the Janjira fort, Murud beach and if time permits, other historical places in and around Murud. Plan for day 2 was to cover Birla Mandir & Kashid Beach.

Janjira fort is accessble from Rajpuri (the old port), 4km from Murud, by sail boats.

History

Janjira fort was originally constructed in the 12th century by Siddis, businessmen turned rulers from Abyssinia, near Africa. While that puts the age of the fort as 950 years old, most records say that the fort in its current form was built over 350 years back by Siddi Johar. This is the only fort in 700+ km coastline of Maharashtra which remained unconquored. With a height of over 90ft above sea and 20 ft strong foundation, it took 22 years to build the fort. Attacked by the Portuguese, the British, Shivaji, Knhoji Angre and Sambhaji, the fort remained unconquored. Sambhaji went ahead and constructed a fort in a nearby island (Padamdurg Fort, now known as Kasa) . Kasa fort is not accessible for public and requires special permission from Port Trust / Navy.

महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या सागर किनार्‍याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणार्‍या अनेक स्थळांचा समावेश होतो. या किनार्‍यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला

रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (जुने नाव सिंधूसागर) आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुका वसलेला असून तालुक्याचे मुख्य ठिकाण मुरुड येथेच आहे. मुरुडमधून चार पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. येथून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.

जंजिर्‍याचे सिद्दी हे मुळचे ऑबिसिनियामधील. हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होवू शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्‍यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला.
जंजिर्‍याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्‍हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडलेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्‍हाणखान इतर सत्ताधिशांना सुचवतोच की, तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करु नका.

जंजिर्‍याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. एकोणीस बुलंद असे बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्‍या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करुन तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्‍यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.

मुरुड जंजीरा या किल्ल्यावर महाराज कधीच आले नाहीत. कारण हा किल्ला शेवटपर्यंत सिद्दीकडेच होता. महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एकमेव अपराजित किल्ला आहे. छ. संभाजीराजांनी प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी हल्ला करणे सुलभ जावे म्हणुन तिथुन जवळच एक किल्ला बांधावयास सुरुवातही केली होती. हा किल्ला ' पद्मदुर्ग' अजुनही अर्धवट अवस्थेत जंजीर्‍यावरुन दिसतो. राजांनी समुद्रातील या किल्ल्यावरुन तर सरखैल कान्होजीराव आंग्रे यांनी राजापुरीसमोरच्या डोंगरावरुन हल्ला करायचा आणि सिद्दीला कोंडीत पकडायचे अशी व्युहरचना ठरली होती. हा डाव तडीस जाता तर ......! <span title=अरेरे" shapes="_x0000_i1025" width="15" border="0" height="15">पण तेव्हा अचानक औरंगजेबाने रायगडावर हल्ला केल्याने छ. संभाजीराजांना ही मोहीम अर्धवट टाकुन रायगडाकडे परतावे लागले आणि एक अजिंक्य जलदुर्ग स्वराज्यात येता येता राहिला.

जंजिर्‍याच्या तटबंदीवरुन विस्तृत भाग दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्‍यावरील सामराजगड ही येथून दिसतो. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरुन तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.


छत्त्रपति शिवाजी महाराज की जय.. जय भवानी.. जय शिवाजी...


*** सह्याद्री संघ ***




SAHAYDRI SANGH JOURNEY STARTS BY SPEED BOAT




VIEW FROM LONG DISTANCE




VIEW FROM CLOSE



TOFF PAHARA..




TOFF BURUJ



SIDE VIEW OF JANJIRA




SIDDI PALACE



SAHAYDRI SANGH AT JANJIRA FORT




ANOTHER POSE



GODE PANI AT FORT



WHILE RETURNING..



EK SACCHA SHIVPREMI.. SACHIN CHAVAN



*** सह्याद्री संघ ***


No comments: